'विरोधकांना काहीच काम राहिलेलं नाही' मुख्यमंत्री शिंदेंची टीका

'विरोधकांना काहीच काम राहिलेलं नाही' मुख्यमंत्री शिंदेंची टीका

वर्षा ड्रग्ज माफियाचा अड्डा झालाय या संजय राऊतांच्या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत 'विरोधकांना काही काम नाही.
Published by :
shweta walge

वर्षा ड्रग्ज माफियाचा अड्डा झालाय या संजय राऊतांच्या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत 'विरोधकांना काही काम नाही. आम्ही झाडं‌ लावतोय त्यांना काही कामधंदा राहिला नाही, आम्ही कामातून उत्तर देतोय. इगो ठेवुन बंद केलेली कामं आम्ही पुढे नेतोय यामुळं जे कोणी बोलतायेत त्यांना काही बोलायचं नाही, असं ते म्हणाले.

ते म्हणाले की, विरोधकांना काहीच काम राहिलेलं नाही. सकाळी उठलं की त्यांना राजकारण करायचं वेगवेगळ्या कुरघोड्या करायच्या आणि वातावरण दूषित करायचं इतकच काम विरोधकांना राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कामावर लक्ष देत असतो. आम्ही सकाळी उठलं की लोकांची काम करतो, लोकांच्यामध्ये जातो, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर ड्रग्स माफियाचा अड्डा या मुद्द्याला बगल दिली.

सातारा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या मूळ गावी दरे गावात आले आहेत.आज त्यांनी या गावातील डोंगर भागात बांबूची लागवड केली. यावेळी अध्यक्ष कृषी मुल्य पाशा पटेल, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बांबूची लागवड किती महत्वाची आहे याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. सातारा जिल्ह्यात जवळजवळ 10 हजार हेक्टर वर बांबू लागवड केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे

'विरोधकांना काहीच काम राहिलेलं नाही' मुख्यमंत्री शिंदेंची टीका
दीपक केसरकरांची राऊतांवर टीका, म्हणाले 'एवढं जरी राऊतांनी समजून घेतलं तर...'

दरम्यान, राज्यात होणाऱ्या ड्रग्स तस्करीवर बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्रात अंमली पदार्थांचा व्यापार वाढलेला आहे. याचं उत्तर देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावा लागेल. रेव पार्टीमध्ये सापाचं विषापासून तयार होणारा अमली पदार्थ सेवन करणारे वर्षावर पोहोचतात आणि त्यांचं नाव तुम्हाला माहित आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती नाही?, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com