Maharashtra Municipal Election
Maharashtra Municipal ElectionMaharashtra Municipal Election

Maharashtra Municipal Election : मुंबईपासून संभाजीनगरपर्यंत पालिका निवडणुकांचे बिगूल वाजले; कोणकोणत्या महानगरपालिकांमध्ये होणार मतदान? जाणून घ्या एका क्लिकवर!

राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीला 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होईल, आणि त्यानंतर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी केली जाईल.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Maharashtra Municipal Election) राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीला 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होईल, आणि त्यानंतर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी केली जाईल. या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक मुख्य आकर्षण ठरणार आहे, पण राज्यातील इतर महापालिकांमध्ये देखील तगडी लढत होईल. त्यामुळे संपूर्ण राज्यभर निवडणुकीचा उत्साह दिसून येईल.

कुठल्या कुठल्या महापालिकांसाठी होणार निवडणूक?

राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि इतर महापालिकांसह खालील शहरांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, भिवंडी, निजामपूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, जळगाव, धुळे, मालेगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाडा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर.

निवडणूक कधी होणार?

  • उमेदवार नोंदणी: 23 ते 30 डिसेंबर 2025

  • उमेदवारी अर्जांची छाननी: 31 डिसेंबर 2025

  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 2 जानेवारी 2026

  • उमेदवारांच्या चिन्हांचे वाटप आणि अंतिम यादी जाहीर: 3 जानेवारी 2026

  • मतदान: 15 जानेवारी 2026

  • मतमोजणी आणि निकाल: 16 जानेवारी 2026

दुबार मतदारांची समस्या:

महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याआधी विरोधकांनी मतदार यादीत घोळ आणि दुबार मतदार असण्याबाबत आक्षेप घेतले होते. त्यावर आता निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे की, दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार (* *) चिन्ह दर्शवले जाईल. यामुळे या मतदाराला कोणत्या ठिकाणी मतदान करायचं आहे, हे निश्चित केलं जाईल. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांची तयारी जोरात सुरू असून, राज्यभर निवडणुकीचा उत्साह वाढत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com