काँग्रेसच्या पत्राला निवडणूक आयोगाचं ६६ पानी उत्तर, आरोप फेटाळले
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी निवडणूक आयोग, ईव्हीएमवर शंका व्यक्त केली होती. काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून ५० जागांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या ठिकाणी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ५० हजार मतदार जोडल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र आता निवडणूक आयोगाने प्रत्येक जागेची चौकशी करून काँग्रेसला ६६ पानांचे सविस्तर उत्तर पाठवले असून सर्व दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये 50 मतदारसंघांमध्ये 50 हजार मतदारांची नावे वाढल्याच्या काँग्रेसच्या दाव्याला निवडणूक आयोगानं उत्तर दिलं आहे. 'केवळ 6 मतदारसंघातच 50 हजार मतदार वाढले असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेपर्यंत 48 लाख मतदारांची नावं नोंदवली गेली. तर 8 लाख वगळली गेली. म्हणजे लोकसभा ते विधानसभा या काळात राज्यभरात एकूण 40 लाख मतदारांची वाढ झाल्याचं स्पष्टीकरण आयोगानं दिलं आहे. सरासरी काढली तर प्रत्येक मतदारसंघनिहाय 2777 नावं वगळल्याचं समोर आलं आहे.
निवडणूक आयोगाने काय उत्तर दिलं?
निवडणूक आयोगाने सांगितले की, ५० विधानसभेच्या जागांवर जुलै ते नोव्हेंबर ५० हजार मतदार जोडण्याचा काँग्रेसचा आरोप तथ्यात्मक स्वरुपात चुकीचा आहे. असं काहीही झालेले नाही. आम्ही प्रत्येक सीटचे तपशील तपासले आहेत. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ५० हजार मतदारांची भर पडली, मात्र, ती केवळ ६ विधानसभा जागांवर जोडली गेली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-