Vice-Presidential Election : आज उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक
थोडक्यात
आज उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणार
दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग
सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल
(Vice-Presidential Election) उपराष्ट्रपतीपदासाठी आज, मंगळवार 9 सप्टेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत होत आहे.
या निवडणुकीत एकूण 782 खासदार मतदान करणार असून त्यामध्ये लोकसभेतील 543, राज्यसभेतील 233 आणि 12 नामनिर्देशित सदस्यांचा समावेश आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवड प्रामाणिक प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे (STV) केली जाते. खासदार गुप्त मतदानाद्वारे उमेदवारांना पसंतीच्या क्रमाने मत देतात आणि बहुमत गाठेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहते.
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर झाली. आज यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत सकाळी 10 वाजता मतदान करतील.