विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात; आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात; आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 2 जुलै उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारांना 2 जुलैपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. 11 जागांसाठी 12 जुलै रोजी होणार मतदान होणार आहे.

येत्या २७ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या जागा रिक्त होणार आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३ जुलै रोजी अर्जांची छानणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ५ जुलै रोजी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com