वीजेचा झटका, महिन्याचे वीज बिल 200 रुपयांनी महागणार

वीजेचा झटका, महिन्याचे वीज बिल 200 रुपयांनी महागणार

महागाईमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे.

महागाईमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. यातच आता एक सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आहे ती म्हणजे महिन्याचे वीज बिल आता 200 रुपयांनी महागणार आहे. राज्यात पुन्हा एकदा वीज दरवाढ होणार आहे. किमान 60 पैसे प्रति युनिट वाढ होणार आहे. सर्वसामान्य जनतेला आता शिंदे सरकार पुन्हा चांगलाच झटका दिला आहे.

सध्या हे शुल्क १.३० रुपये प्रति युनिट इतके आहे. आता पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे. त्यामुळे इंधन शुल्कचा दर हा 2 रुपयांपेक्षा जास्त होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात महानिर्मिती 7 औष्णिक वीज प्रकल्पांमधून 30 संचांद्वारे वीजनिर्मिती करत असते. सप्टेंबर अखेरपर्यंत कंपनीला 34 हजार 806 कोटींचा वीज खरेदी खर्च आला. ज्येष्ठ वीज तज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले की, उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढली असताना कोल इंडियाकडून फक्त 20 टक्के कोळसा पुरवण्यात आला होता. त्यामुळे महानिर्मितीला बाहेरून कोळसा खरेदी करावा लागला. त्यासाठी 20 हजार कोटींचा खर्च आला. तसंच क्रॉस सबसिडीतील पैसादेखील कोरोना काळात मिळाले नाही. त्यामुळे आणखी 20 हजार कोटींचे नुकसान झाले आहे, त्यामुळे किमान 40 हजार कोटींच्या घरात नुकसान झाले आहे.

राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आहे. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता शिंदे सरकार आणखी एक झटका दिलाय.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com