एलॉन मस्क यांच्याकडून नोकरकपातीला आजपासून सुरुवात होणार

एलॉन मस्क यांच्याकडून नोकरकपातीला आजपासून सुरुवात होणार

टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क हे ट्विटरचे मालक बनले आहेत. एलॉन मस्क यांनी कंपनीच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क हे ट्विटरचे मालक बनले आहेत. एलॉन मस्क यांनी कंपनीच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. ट्विटरच्या वापरकर्त्यांना अकाऊंट वेरिफाईड करुन ‘ब्लू टिक’ मिळवण्यासाठी आठ डॉलर म्हणजेच अंदाजे ६६१ रुपये प्रती महिना मोजावे लागणार आहेत. याची माहिती त्यांनी स्वत: सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे. याच्या पाठोपाठ आता त्यांनी अजून एक निर्णय घेतलेला आहे.

ट्विटरवर ताबा मिळताच एलॉन मस्क यांनी नोकरकपातीचे संकेत दिले होते आणि ही भीती आता खरी ठरणार आहे. एलन मस्क यांच्या नोकरकपातीला आजपासून सुरुवात होणार आहे. कामावरुन काढण्यात आलं आहे की नाही, याबाबत ट्विटरकडून ईमेलद्वारे आज कर्मचाऱ्यांना कळवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. “ट्विटरला भक्कम स्थितीत आणण्यासाठी आम्ही नोकरकपातीच्या कठिण प्रक्रिेयेतून आज जात आहोत”, असा ईमेल कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठवल्याची देखिल माहिती मिळत आहे.

कर्मचारी, ट्विटरच्या यंत्रणांसह ग्राहकांच्या मजकुराच्या सुरक्षेसाठी हे करण्यात येत असल्याचं ट्विटरकडून सांगण्यात येत आहे. या कंपनीतून काढल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांच्या पगाराएवढा ‘सेवरन्स पे’ दिला जाऊ शकतो असे समजते. तसेच एलॉन मस्क यांनी ट्विटरमधून तीन हजार ७०० नोकऱ्यांची कपात केली जाणार असल्याचे देखिल समजते.

एलॉन मस्क यांच्याकडून नोकरकपातीला आजपासून सुरुवात होणार
ट्विटर ‘ब्लू टिक’साठी आता दर महिन्याला मोजावे लागणार पैसे; एलॉन मस्कने दिली माहिती
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com