पायलटच्या केबिनमधून धूर आल्याने स्पाईसजेट विमानाची इमर्जन्सी लँडिंग

पायलटच्या केबिनमधून धूर आल्याने स्पाईसजेट विमानाची इमर्जन्सी लँडिंग

दिल्ली-जबलपूर स्पाईसजेट विमान धुरामुळे विमानाला दिल्ली विमानतळावर परत लँडिंग करावे लागले. ही घटना आज सकाळी घडली. अचानक झालेल्या या गोंधळामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ पसरला होता.
Published by :
Shweta Chavan-Zagade

दिल्ली-जबलपूर स्पाईसजेट विमान (SpiceJet aircraft) धुरामुळे विमानाला दिल्ली विमानतळावर परत लँडिंग करावे लागले. ही घटना आज सकाळी घडली. अचानक झालेल्या या गोंधळामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ पसरला होता. हे विमान 500 फूट उंचीवर गेले होते. यावेळी अचानक विमानाच्या केबिनमध्ये धुराचे लोट पसरू लागले. विमानात अचानक धुराचे लोट पसरल्याने प्रवाशांमध्येही एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याया घटनेबाबत स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले आहे. या विमानाने दिल्ली विमानतळावरून सकाळी 6.15 वाजता उड्डाण केले होते.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये केबिनमध्ये धूर आल्याने सर्व प्रवासी वर्तमानपत्रे आणि पुस्तकांनी धूरापासून बचाव करत असल्याचे दिसत आहे. अचानक आलेल्या धुरामुळे विमानातील प्रवासी देखील काही वेळासाठी घाबरले. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पायलटने विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर उतवरण्याची परवानगी घेतली आणि यानंतर विमानाचे पुन्हा दिल्ली विमानतळावर सुरक्षितरित्या आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

पायलटच्या केबिनमधून धूर आल्याने स्पाईसजेट विमानाची इमर्जन्सी लँडिंग
गुवाहाटीला जाण्याचा मलाही पर्यात होता, पण...; संजय राऊत

मिळालेल्या माहितीनुसार, विमानात धुराचे लोट पसरताच प्रवासी घाबरले आणि त्यांनी आरडाओरडा करणयास सुरुवात केली. विमान उडवत असलेल्या वैमानिकानेही परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर विमान सुरक्षित इमर्जन्सी लँडिंगसाठी दिल्ली विमानतळावर परत आणले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com