मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचलनालय) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे.
Published by :

दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचलनालय) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ईडीच्या पथकाने अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानी जाऊन झडती घेतली. दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली.

दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी केजरीवाल यांना दिलासा देण्यास नकार दिल्याने ईडीच्या पथकाने केजरीवाल यांच्या घरी छापा टाकला. केजरीवाल यांना मागील वर्षापासून आतापर्यंत चौकशीसाठी दहावेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, केजरीवाल यांनी समन्सला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ईडीने कारवाईचा बडगा उगारत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com