Ind vs Eng 3rd Test Match : इंग्लंडनं 22 धावांनी सामना जिंकला; जडेजा-सिराजची झुंज अपयशी, इंग्लंड संघ 2-1 नं आघाडीवर
भारत आणि इंग्लंड संघामध्ये होणारा कसोटी सामना भारतानं गमावला. लॉड्समध्ये खेळला जाणारा आजचा तिसऱ्या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस इंग्लंड संघानं सार्थकी लावला असून तिसरा कसोटी सामना भारतानं 22 धावांनी गमावला. इंग्लंडनं भारतासमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं असून भारतीय संघ अवघ्या 170 धावांमध्ये संपुष्टात आला. त्यामुळे भारत विरूद्ध इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांपैकी 2 सामने इंग्लंडनं तर एक सामना भारतानं जिंकल्यामुळे इंग्लंड एका सामन्यानं आघाडीवर आला आहे.
इंग्लंडनं जरी हा सामना जिंकला असला तरी रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी उत्तम पार्टनरशीपचं उदाहरण देत इंग्लंडसाठी हा विजय कठिण वळणावर आणून ठेवला होता. जडेजा आणि सिराजनं 47 चेंडून 23 धावांनी खेळी खेळत इंग्लंडला 10 विकेटसाठी ताटकळत ठेवलं. भारताच्या ११२ धावा असताना जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांची पार्टनरशीप संपुष्टात आली. बुहराहची विकेट पडल्यानं जडेजा आणि सिराजवर संघ सावरण्याची जबाबदारी आली. ती दोघांनीही उत्तम पार पाडली. सिराजनं जडेजाला चांगली साथ देत इंग्लंडचा विजयी लांबणीवर घेऊन गेला. मात्र शोएब बशिरच्या रिव्हर्स स्पिन बॉलनं सिराजला बोल्ड केल्यामुळं भारतानं हा सामना गमावला.
या विजयात इंग्लंडच्या गोलंदाजांनी उत्तम खेळ दाखवतं जोफरा आर्चर आणि बेन स्ट्रोक यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या असून ब्रायडन कार्सनं 2 तर वॉक्स आणि बशिरनं प्रत्येकी एक विकेट घेकली. भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात इंग्लंड संघ एका कसोटी विजयानं आघाडीवर असून दोन्ही संघामधील 4 था कसोटी सामना हा 23 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. यावेळी भारताकडे सामना गुण बरोबरीचा करण्याची संधी आहे.