KDMC | Shiv Sena corporator
KDMC | Shiv Sena corporatorteam lokshahi

आयुक्तांच्या बैठकीनंतरही खड्डे तसेच, शिवसेना नगरसेवकाने वेधले लक्ष

खड्डे भरले नाही तर आयुक्तांच्या दालनासमोर चिखल फेको आंदोलनाचा इशारा
Published by :
Shubham Tate
Published on

कल्याण (अमजद खान) - कल्याण डोंबिवतीतील रस्त्यावरील खड्डे गणपतीपूर्वी बुजविण्यात येतील असे महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी माजी नगरसेवकांना बैठक घेऊन आश्वासीत केले होते. बैठक होऊन दोन दिवस उलटून गेले तरी अद्याप रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. खड्डे भरण्यास सुरुवात न केल्यास आयुक्तांच्या दालनासमोर चिखल फेको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी दिली आहे. (Even after the Commissioner's meeting, the Shiv Sena corporator drew attention to potholes as well)

KDMC | Shiv Sena corporator
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, पुढील महिन्यात डीए वाढीसह या मोठ्या घोषणा होणार

महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरीक आणि वाहन चालकांना त्याचा त्रस सहन करावा लागतो. यासाठी माजी नगरसेवकांसोबत आयुक्तांनी दोन दिवसापूर्वी बैठक घेतली. या बैठकीत गणपती पूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविले जातील असे आश्वासन आयुक्तांनी नगरसेवकांना दिले. त्यानंतर काल आयुक्तांनी स्वत: ठाकूर्ली येथील नव्वद फूटी रस्त्यावरील खड्डय़ांची पाहणी केली.

चरॅपिड कॉन्क्रीटीकरणाचा प्रयोग करुन खड्डे बुजविले जातील असेही आयुक्तांनी काल सांगितले. दोन दिवस उलटून गेले तरी कल्याण पश्चिमेतील टिळकचौक, लेले आळी, दुर्गाडी ते पत्री पूल बायपास रोड, चिराग हॉटेल समोरील रस्ता, कृष्णा टॉकीज परिसर, आंबेडकर रोडवरील खड्डे अद्याप बुजविण्यास सुरुवात झालेली नाही. याकडे माजी नगरसेवक उगले यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. खड्डे बुजविण्याचे काम केले नाही तर आयुक्तांच्या दालनासमोर चिखल फेको आंदोलन केले जाईल असा इशारा प्रशासनास दिला आहे.

KDMC | Shiv Sena corporator
पण तुमच्याच घराशेजारी सर्रासपणे डान्सबार सुरू, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचा घेतला समाचार

बाईट-मोहन उगले, माजी नगरसेवक, शिवसेना

रस्त्यावरील खड्डय़ामुळे गाडी चालविणो शक्य होत नाही. खड्डयात गाडी आदळून चालक पडतात. खड्डय़ातून गाडी चालविल्याने पाठदुखी होते. या भागातील नगरसेवकांनी या समस्येकडे लक्ष दिले नाही. नागरीकांनी आणि वाहन चालकांनी किती तक्रारी करायच्या. त्या तक्रारींची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com