शिंदे गटाच्या शक्ती प्रदर्शनाआधीच डोंबिवलीतील रस्त्यावरुन मनसेची बॅनरबाजी

शिंदे गटाच्या शक्ती प्रदर्शनाआधीच डोंबिवलीतील रस्त्यावरुन मनसेची बॅनरबाजी

शिंदे गटाच्या मेळाव्याच्या आधीच मनसे रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत बॅनरबाजी करुन शिंदे गटाला अप्रत्यक्षरित्या चिमटा काढला आहे.

अमजद खान, कल्याण : शिंदे गटाच्या मेळाव्याच्या आधीच मनसे रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत बॅनरबाजी करुन शिंदे गटाला अप्रत्यक्षरित्या चिमटा काढला आहे. डोंबिवलीतील एमआयडीसी निवासी परिसरात वर्क ऑर्डर होऊन दोन महिने उलटले तरी रस्त्याची कामे सुरु झालेली नाही. त्यावर लक्ष्य केले आहे. कोणी मुहूर्त देतं का मुहूर्त असे बॅनरवर लिहत रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डरची कॉपीच त्या बॅनवर झळकविली आहे. हा बॅनर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लावला आहे.

कल्याण डोंबिवलीतील पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नाहीत. या रस्त्यावरुन राजकीय पक्षातील नेते एकमेकांना लक्ष्य करीत टिकेचे तोंडसूख घेत आहेत. काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरुन केडीएमसी आयुक्तांना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील रस्त्याच्या कामाचा कोटय़ावधी निधी नामंजूर केल्याबदद्ल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लक्ष्य केले होते. त्यावर शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांनी प्रतिउत्तर दिले. एमआयडीसीतील निवासी भागातील रस्त्यावरील खड्डय़ावरुन मनसेकडून टिकेचे लक्ष्य केले जात आहे. या भागातील रस्ते विकासाकरीता 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन महिन्यापूर्वी या कामाची वर्क ऑर्डरही झालेली आहे. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही असा आरोप करीत मनसेने डोंबिवलीत काही ठिकाणी बॅनरबाजी करीत शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.

शिंदे गटाच्या शक्ती प्रदर्शनाआधीच डोंबिवलीतील रस्त्यावरुन मनसेची बॅनरबाजी
जेएसडब्लू कोकणात करणार सुमारे ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक-उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
Lokshahi
www.lokshahi.com