Supriya Sule : 'रोज नयी सुबह होती हैं...' , 'त्या' नेत्याच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंचं मिश्किल उत्तर
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष, प्रशांत जगताप यांनी काल आपल्या पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पुणे महानगर पालिकेसमोर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा राजीनामा जाहीर केला. त्यांनी पक्ष नेतृत्वाला आजवर दिलेल्या संधीसाठी आभार मानले.
पार्टीच्या कार्यकारी अध्यक्ष, सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांची चार तासांहून अधिक काळ चर्चा झाली होती, असे त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांनीही काल झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रशांत जगताप यांचा राजीनामा अद्याप स्वीकारला गेलेला नाही. तथापि, प्रशांत जगताप यांनी आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व सोडले आहे. या राजीनाम्यावर रोज नयी सुबह होती हैं, प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंचं मिश्किल उत्तर दिले आहे.
थोडक्यात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी पक्षाच्या प्राथमिक तसेच क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला.
पुणे महानगरपालिकेसमोर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
राजीनाम्याबाबतची माहिती त्यांनी माध्यमांसमोर मांडली.
यावेळी त्यांनी पक्ष नेतृत्वाने आजवर दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त केले.

