Beed
BeedTeam Lokshahi

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हक्कालपटी, बीडच्या राजकारणात खळबळ

जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाच्या संपर्कात नव्हते

बीडच्या राजकरणामधले मोठे नाव जयदत्त क्षीरसागर यांची आज शिवसेना ठाकरे गटाकडून हक्कालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे बीडचे राजकीय वातावरण एकदमच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या बीड पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषेद घेत ही कारवाई केली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून त्यांचा शिवसेनेशी कसलाही संबंध नसल्याचे असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

Beed
या तिनही नेत्यांच्या मनात उद्धव ठाकरेंची दहशत म्हणून एकत्र आले-अंबादास दानवे

यावेळी बोलताना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख धोंडू पाटील म्हणाले की, जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाच्या संपर्कात नव्हते. त्यांनी पक्षात येऊन पक्षाचा कसलाही फायदा केला नाही तर त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला. आघाडी सरकारच्या काळात मंजूर करून घेतलेल्या 70 कोटीच्या कामाचा शुभारंभ शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते केली. त्यांची मागील काही दिवसातील भूमिका लक्षात घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार जयदत्त क्षीरसागर यांचा पक्षाशी कसलाही संबंध नसल्याचे जाहीर करण्यात आले. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com