Sachin Vaze
Sachin VazeTeam Lokshahi

माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर

सत्र न्यायालयाचा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सचिन वाझेंना दिला दिलासा

देशाचे प्रसिद्ध उद्द्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटालिया घराजवळ जिलेटीन ठेवल्याने सचिन वाझे महाविकास आघाडीच्या काळात देशभरात चर्चेत आले होते. त्यानंतर या प्रकरणासह अनेक बाजू सचिन वाझे यांनी बाजू उघड केल्या होत्या. त्यानंतर अनेक महिन्यांपासून कोठडीत असणाऱ्या वाझे यांना सत्र न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिलासा दिला आहे. सचिन वाझे यांना सत्र न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. मात्र, इतर प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने वाझेचा मुक्काम सध्यातरी तुरुंगातच राहणार आहे. 

Sachin Vaze
देशभक्त नागरिक उद्धव व आदित्य ठाकरेंना माफ करणार नाही; राहुल गांधींवरुन शेलारांचा निशाणा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती.

त्या सोबतच मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याच्या प्रकरणामुळे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासा दरम्यान सांगितले होते.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com