Explosives found near Mumbai Goa Highway inside river in Raigad
Explosives found near Mumbai Goa Highway inside river in Raigad Team Lokshahi

धक्कादायक! रायगडमध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नदी पात्रात स्फोटकं

पेणजवळ असलेल्या भोगावती नदीवरील पूला खाली ही स्फोटकं सापडली आहेत.

भारत गोरेगावकर, रायगड

रायगडमधील पेण येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नदीपात्रात स्फोटकं आढळली आहेत. पेणजवळ असलेल्या भोगावती नदीवरील पूला खाली ही स्फोटकं सापडली आहेत. दरम्यान, याठिकाणी पोलीस, बॉम्ब शोधक पथक दाखल झालं आहे. जिलेटीन व डिटोनेटर असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. ही स्फोटकं सापडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com