जेवणासाठी ते बाहेर गेले आणि चोरट्यांनी घर साफ केले,तब्बल ६६ लाखांची घरफोडी
अमोल धर्माधिकारी, पुणे
पुण्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना सतत होताना दिसत आहे. या चोरट्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस मात्र कुठेतरी कमी पडल्यास दिसून येत आहे. शहराच्या उच्चभ्रू भागांपैकी एक असणाऱ्या औंध परिसरात भरदिवसा चोरट्यांनी बंगला फोडून तब्बल ६६ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. त्यात पाच लाखांचे परकीय चलन तसेच डायमंड व सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे.
याप्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी दुपारी घडली आहे. कुटूंबासाबोत जेवण्यासाठी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी पाठिमागील दरवाजाने आत शिरून त्यांनी परकीय चलन व डायमंड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ६६ लाख ४२ हजारांचा ऐवज चोरून नेला. दुपारी तक्रारदार चारच्या सुमारास परत आले.
त्यावेळी त्यांना दरवाजा उघडलेला असून, घरातील साहित्य व कपाटातील वस्तू अस्थाव्यस्थ पडल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. चतु:शृंगी पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकांनी लागलीच धाव घेतली. सोसायटी किंवा बंगल्यात सीसीटीव्ही नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या भागातील सीसीटीव्हीची पडताळणीकरून चोरट्यांचा माग काढला जात आहे.