स्वतः आचारी, शाहरुख खानसोबत काम, राहतो फराह खानसोबत, कोण आहे तो ?
कॉरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानचा कुक दिलीपने आपल्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओजद्वारे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. चित्रपटसृष्टीपासून टीव्ही स्टार्सपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याचे चाहते तयार झाले आहेत. परंतु, त्याची लोकप्रियता फक्त त्याच्या कुकिंग कौशल्यापुरती मर्यादित नाही.
अलिशान मालमत्ता आणि साधी जीवनशैली
दिलीपकडे तीन मजली, सहा बेडरूम असलेला बंगला आहे, जो त्याच्या बिहारमधील मालमत्तेचा भाग आहे. या बंगल्याबरोबरच त्याच्याकडे खासगी तलाव आणि भरपूर जमीन आहे. आपल्या कुटुंबासोबत (पत्नी, दोन मुले आणि आई-वडील) तो बिहारमधील या आलिशान बंगल्यात राहतो, तर तो स्वतः मुंबईत फराह खानसोबत काम करत आहे.
लक्झरी कार आणि महागडी गाडीची आवड
सध्या दिलीप बीएमडब्ल्यु कार चालवतो. तो महागडी गाडी घेण्याची इच्छा देखील व्यक्त करतो. काही व्हिडिओंमध्ये करण वाही आणि करण पटेल यांच्याशी झालेल्या चर्चेत त्याने सांगितलं, "आता BMW मध्ये फिरतोय, पण एखादी महागडी गाडी घ्यायची आहे," या विनोदी परंतु हुशार उत्तराने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
सेलिब्रिटींसोबतचे धमाकेदार प्रोजेक्ट
दिलीप आणि फराह खान यांच्यातील केमिस्ट्री पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. नुकतेच दिलीपने शाहरुख खानसोबत जाहिरातीसाठी शूटिंग केले आहे. ज्यामुळे तो चर्चेचा मुख्य केंद्र बनला आहे. फराहच्या व्हिडिओमध्ये दिलीपने अनेकदा हा उल्लेख केला आहे की, पुढील प्रोजेक्टमध्ये तो शाहरुख खानसोबत काम करणार आहे.
दहा महिन्यांत स्टार बनण्याचा अद्भुत प्रवास
दिलीपने फक्त १० महिन्यांत फराह खानसोबत युट्युबवर आपला प्रवास सुरू करून एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या हजरजबाबीपणा आणि विनोदी स्वभावामुळे प्रेक्षकांमध्ये तो पटकन लोकप्रिय झाला आहे. आता इंटरनेटवर, गाड्या, मालमत्ता आणि त्याच्या बिहारमधील जीवनशैलीसंदर्भातील अनेक प्रश्नांची चर्चा सुरू आहे.