लाईट ऑफ युनिटी संकल्पनेतून भारत जोडो यात्रेला निरोप

लाईट ऑफ युनिटी संकल्पनेतून भारत जोडो यात्रेला निरोप

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद तालुक्यातील निमखेडी इथे भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील समारोप सर्वार्थाने दिव्य झाला.

संदिप शुक्ला, बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद तालुक्यातील निमखेडी इथे भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील समारोप सर्वार्थाने दिव्य झाला. काँग्रेस आमदार तथा माजी मंत्री अँड. यशोमती ठाकुर यांच्या संकल्पनेतून लाईट ऑफ युनिटी ही संकल्पना राबविण्यात आली. निमखेडी हा आदिवासी बहुल भाग आहे. इथल्या स्थानिक नागरिकांनी मेणबत्ती प्रज्वलित करून शांतता व अहिंसेचा संदेश देत लाईट ऑफ युनिटी ही संकल्पना प्रत्यक्षात साकार केली*.

दिव्यांगांनी सादर केलं राष्ट्रगीत

श्री. जगन्नाथ कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष आशिष उमाळे, उपाध्यक्ष अभिजीत वंडाळे, सचिव स्वप्नील उमाळे व कोमल खोत यांच्या सहकार्यातून वृंदावन संगीत विद्यालयाच्या विद्यार्थी तसेच कलाकार अशा सुमारे २०० जणांनी तबला आणि बासरी वाजवून राष्ट्रगीत सादर केले. याच तबला आणि बासरीच्या संगीतावर अकोला जिल्ह्यातील मलकापूर येथील कर्णबधीर मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यीनीं सांकेतिक भाषेतून राष्ट्रगीत सादर केले.

राहुल गांधी भावनिक झाले

भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील एकूण प्रवासात निमखेडीचा समारोप हा सर्वार्थानं भावनिक ठरला. वृंदावन संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह सुमारे २०० जणांच्या टीमने राष्ट्रगीताची ट्यून तबला आणि बासरीच्या सहाय्याने वाजवली. त्याचवेळी कर्णबधीर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचा अर्थ सांकेतिक भाषेतून सांगत राष्ट्रगीत सादर केले. समारोपानंतर राहुल गांधी यांनी राष्ट्रगीत सादर करणा-या कर्णबधीर विद्यार्थ्यांचा स्वतःच्य मोबाईलमध्ये फोटो काढला. इतकेच नव्हे तर राहुल यांनी त्या विद्यार्थ्यांसोबत सेल्फीही काढला. समारोपाच्या या कार्यक्रमात राहुल गांधी कमालीचे भावनिक झाले होते.

यावेळी दिग्विजय सिंह, महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकुर, माणिकराव ठाकरे, राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, मोहन जोशी, राजेश एकडे, कुणाल पाटील, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, सत्यजित तांबे, कुणाल राऊत, जयश्री देशमुख, प्रवीण देशमुख, श्याम उमाळकर धनंजय देशमुख आनंद वानखेडे, दिनेश गोगलकर, सुरेश चिंचोळकर, स्वाती वाकेकर उपस्थित होते. समारोपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश देशमुख, दिनेश लोकार, पूजा काळे, श्रीकांत जगताप, कार्तिक कुदळे, अनुप बेंडेकर, निळकंठ तायडे, गणेश कळसकर, ओम खंडारे, सुगंध तायडे, सागर देशमुख, निरंजन चव्हाण, जया देशमुख, सविता चव्हाण, राजीव ईटोले, अनुराधा परिवार यांनी परीश्रम घेतले

Lokshahi Marathi
www.lokshahi.com