Haryana
ताज्या बातम्या
Haryana : हरियाणाच्या फरीदाबादमधील सूरजकुंड जत्रेत पाळणा तुटून मोठा अपघात
हरियाणाच्या फरीदाबादमधील सूरजकुंड जत्रेत फिरता पाळणा कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Haryana) हरियाणाच्या फरीदाबादमधील सूरजकुंड जत्रेत फिरता पाळणा कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कर्याला सुरुवात झाली. या प्रक्रियेत एक पोलीस निरीक्षक आणि इतर सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. फिरता पाळणा अचानक तुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या अपघातात एकूण 13 जण जखमी झाले असून तर एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
सूरजकुंड जत्रेत पाळणा अचानक तुटला
हरियाणाच्या फरीदाबादमधील घटना
अपघातात 13 जण गंभीर जखमी
