Nagpur Ravikant Tupkar : "थोडं जरी म्हटलं मंत्र्यांना कापा ठोकाठोकी करा तर लगेच..." रविकांत तुपकरांच मंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य

Nagpur Ravikant Tupkar : "थोडं जरी म्हटलं मंत्र्यांना कापा ठोकाठोकी करा तर लगेच..." रविकांत तुपकरांच मंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य

बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे नागपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचा ट्रॅक्टरसह लाँग मार्च आता नागपूरमध्ये पोहचला आहे. या आंदोलनामुळे नागपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

आमदारांना नाहीतर मंत्र्यांना सुद्धा कापा असं वादग्रस्त वक्तव्य काल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलं होतं, यावर रविकांत तुपकर आणि प्रतिक्रिया दिली. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमचा बाप मरत आहे...थोडं जरी म्हटलं मंत्र्यांना कापा ठोकाठोकी करा लगेच पोटात गोळा उठला अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी दिली.

"माझ्यावर टीका झाली तर मला काय फरक पडतो.. दिवसाला रोज दहा ते बारा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होते ह्या आत्महत्या नाही तर सरकारने पाडलेले खून आहे .सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमचा बाप मरत आहे...थोडं जरी म्हटलं मंत्र्यांना कापा ठोकाठोकी करा लगेच पोटात गोळा उठला" अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

"सरकारने आमचे खून पाडले आहे म्हणून खून का बदला खून से लेंगे..नांदेड जिल्हात तहसीलदाराची गाडी फोडली उद्या मंत्र्यांच्या गाड्या सुद्धा शेतकऱ्यांचे पोरं फोडतील.नागपूरची लढाई ही आरपारची लढाई असेल. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे मी काही कोणाला शिव्या दिल्या नाही दुसरा कृत्य केलं नाही.. पोलिसांच्या बंदुकीतील गोळ्या कमी पडतील पन आमच्या छात्या कमी पडणार नाही हे सांगायला आम्ही नागपूरला आलो आहे" असं रविकांत तुपकरांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com