'मुख्यमंत्री साहेब क्या हुआ तेरा वादा'; पूर आणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल

'मुख्यमंत्री साहेब क्या हुआ तेरा वादा'; पूर आणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल

पूर आणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत मदतीची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिले होते. मात्र आतापर्यंत मदतीच्या नावाखाली एक पैसाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. जिल्ह्यातील लाखो शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

भूपेश बारंगे, वर्धा

पूर आणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत मदतीची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिले होते. मात्र आतापर्यंत मदतीच्या नावाखाली एक पैसाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. जिल्ह्यातील लाखो शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.हामुळे आता शेतकरी मुख्यमंत्री साहेब क्या हुआ तेरा वादा असा सवाल विचारत आहे.

यावर्षी वर्धा जिल्ह्यात जुलै आणी महिन्यात दमदार पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्यात पूर्णपरिस्थितीही निर्माण झाली होती. अतिवृष्टी आणी पुरामुळे जिल्ह्यातील २ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. यामध्ये २ लाख ३२ हजार ६४६ शेतकरी बाधित झाले. नियमानुसार सरकारने ३४५.९९ कोटी मदतनिधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. राज्य सरकारने ८ सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढत मदतीचा प्रस्ताव मंजूर केला होता. 15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले होते. मात्र आजपर्यंत एक पैसाही मिळालेला नाही.

जिल्ह्यात एकूण २ लाख ३२ हजार ६४६ शेतकरी जुलै आणी ऑगस्ट महिण्यात आलेल्या पूर आणी अतिवृष्टीत बाधित झाले.यात वर्धा तालुक्यातील ३३ हजार ११, सेलू तालुक्यातील २७ हजार ३८६, देवळी तालुक्यातील ३० हजार ३४९, आर्वी तालुक्यातील २६ हजार ३९८, आष्टी तालुक्यातील १७ हजार ३८७, कारंजा तालुक्यातील २४ हजार ३, हिंगणघाट तालुक्यातील ३६ हजार ५३३ तर समुद्रपूर तालुक्यातील ३७ हजार ५७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Lokshahi
www.lokshahi.com