PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो 21 वा हप्ता मिळणार की नाही ?असे चेक करा
थोडक्यात
शेतकऱ्यांनो 21 वा हप्ता मिळणार की नाही ?
२१ वा हप्ता केव्हा जारी होऊ शकतो ?
कोणाला हप्ता मिळणार कोणाला नाही ?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजाना केंद्र सरकारच्यावतीने चालवण्यात येत असते. या योजनेचा लाभ केवळ शेतकऱ्यांना मिळत असतो. या योजनेंतर्गत वर्षांतून तीन वेळा दोन हजाराचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळतो. या योजनेचा २१ वा हप्ता यंदा मिळणार आहे.परंतू हा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ? तुम्ही तुमचे स्टेटस चेक करुन ही माहिती घेऊ शकता. चला तर पाहूयात शेतकरी त्यांना हा लाभ मिळणार आहे की नाही कसे तपासू शकतात ते पाहूयात…
२१ वा हप्ता केव्हा जारी होऊ शकतो ?
जर तुम्ही देखील पीएम किसान योजनेशी सलंग्न आहात तर तुम्हालाही २१ व्या हप्त्याचे वेध लागले असतील ? या संदर्भात परंतू अजून सरकारने हा २१ वा हप्ता केव्हा मिळणार याची माहिती जाहीर केलेली नाही. परंतू असे म्हटले जात आहे की नोव्हेंबर महिन्यात हा हप्ता जारी होऊ शकतो . ज्यात शेतकऱ्यांना २ हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे.
कोणाला हप्ता मिळणार कोणाला नाही ?
स्टेप – 1
जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार आहे की नाही ? तर तुम्ही हे चेक करु शकता. सर्वात आधी तुम्हाला तुमचा स्टेटस चेक करण्यासाठी योजनेची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जावे लागणार आहे. किंवा तुम्ही योजनेच्या अधिकृत किसान एपवर देखील जाऊ शकता.
स्टेप – 2
त्यानंतर तुम्हाला येथे अनेक पर्याय दिसतील. परंतू ‘Know Your Status’ या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला येथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागणार आहे.जो तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळी मिळतो. तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशनचा नंबर येथून मिळवू शकता.
स्टेप – 3
तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक जर तुम्हाला माहिती पडला असेल तर येथे तो भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड येथे दिसेल. त्याला येथे भरावे लागेल. आता तुम्हाला पुन्हा गेट डिटेलवाल्या बटणावर क्लिक करावे लागेल.त्यानंतर तुम्हाला आपले स्टेटस दिसेल आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला हप्ता मिळू शकतो की नाही ?
