Solapur : पंचनामे झाले तरी मदत मिळेना, शेतकऱ्यांचा ओढ्याच्या पाण्यात बसून आक्रोश
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. (Rain) अतिवृष्टी होऊन अनेक भागांमध्ये पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र, पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही. दरम्यान, महापुरामुळे सीना नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी शेतात पाणीच पाणी साचले.
ज्यामुळे तिऱ्हे येथील एका शेतातील मक्याचे पीक पूर्ण पाण्यात झोपल्याचे पाहायला मिळाले. यानंतर तिऱ्हे येथील शेतामधील पिकांचे पंचनामे झाले नसल्याची माहिती तेथील ग्रामस्थांनी दिली. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांचे ओढ्याच्या पाण्यात बसून आंदोलन केलं आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शेतकरी नेते विकी बाबा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी या लक्षवेधी आंदोलनाला सुरुवात केली. पंचनामे झाले तरी शेतकऱ्यांना कोणते पद्धतीची मदत मिळाली नाही या निषेधार्थ, अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथे शेत शिवारात ओड्याच्या पाण्यात बसून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.