Farmers against Dada Bhuse
Farmers against Dada BhuseTeam Lokshahi

'50 खोके, मंत्री ओके' शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत केला दादा भुसेंचा निषेध

ओला दुष्काळ जाहीर न केल्याच्या निषेधार्थ दादा भुसे यांच्या कार्यक्रमादरम्यान धुळ्यातील शेतकरी आक्रमक
Published by :
Vikrant Shinde

राज्यात राजकीय भुकंप येऊन सत्तापालट झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचं मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी सातत्याने शिंदे सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करून शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत आहेत.

आज अनेक विकासकामांच्या उद्घाटनासाठी शिंदे गटातील दादा भुसे हे धुळ्यात गेले होते. दरम्यान, विकासकामाच्या लोकार्पणाचा लोकार्पण सोहळा सुरू असतानाच शेतकऱ्यांनी जोरजोरात '50 खोके, मंत्री ओके' अश्या घोषणा देत हातात काळा झेंडा दाखवून दादा भुसे यांचा निषेध केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com