Farmer Loan
Farmer LoanFarmer Loan

Farmer Loan : पीक कर्जासाठी बँकेच्या फेऱ्यांना रामराम; 'या' पोर्टलमुळे कर्ज प्रक्रिया सोपी होणार

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता पीक कर्जासाठी बँकेत वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. सरकारने सुरू केलेल्या जनसमर्थक पोर्टलमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कर्ज मिळणार आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Kisan Loan : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता पीक कर्जासाठी बँकेत वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. सरकारने सुरू केलेल्या जनसमर्थक पोर्टलमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कर्ज मिळणार आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

या नव्या पद्धतीत शेतकऱ्यांनी सर्वप्रथम 'जनसमर्थक पोर्टलवर' नोंदणी करायची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पीक कर्जासाठीचा अर्ज ऑनलाईन भरता येईल. अर्ज भरल्यानंतर तो थेट संबंधित बँकेकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होणार आहे.

आतापर्यंत पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकांमध्ये जावे लागत होते. अनेकदा कागदपत्रांमध्ये चुका काढल्या जात आणि त्या दुरुस्त करण्यासाठी पुन्हा-पुन्हा बँकेत जावे लागे. यामुळे शेतकऱ्यांना वेळ आणि मानसिक ताण सहन करावा लागत होता. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने हा ऑनलाईन उपक्रम सुरू केला आहे.

ई-सेवा केंद्रे आणि सेतू सुविधा केंद्रांमार्फत शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून घेतले जात आहेत. पात्र शेतकऱ्यांना अवघ्या एका तासात कर्ज मंजूर होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवला जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा फार्मर आयडी, आधार क्रमांक, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक अशी आवश्यक माहिती गोळा केली जाणार आहे. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच अर्ज बँकेकडे पाठवला जाणार असल्याने बँकांकडून कर्ज नाकारण्याची शक्यता कमी होणार आहे. यामुळे पीक कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com