ताज्या बातम्या
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; आज मुंबईत धडकणार शेतकऱ्यांचा मोर्चा
शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला सरकारकडून हिरवा कंदील दिल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला सरकारकडून हिरवा कंदील दिल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री फडणवीसांनी हिरवा कंदील दिला.
याच पार्श्वभूमीवर आता शेतकरी आक्रमक झाले असून आज शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. आज महामार्गाने बाधित राज्यातील 12 जिल्ह्यांतील शेतकरी, शेतमजूर आणि गावकरी सकाळी 9 वाजता आझाद मैदानावर आंदोलनासाठी एकत्र येणार आहेत.
या आंदोलनामध्ये जयंत पाटील, राजू शेट्टी, सतेज पाटील, आदित्य ठाकरे, कैलास पाटील, प्रवीण स्वामी, रोहित पाटील, जयंत आसगावकर, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.