Cough Syrup : 'कफ सिरप' प्रवर्गातील औषधांची विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय करू नये; अन्न व औषध प्रशासनाचे विक्रेत्यांना निर्देश
थोडक्यात
'सिरप' प्रवर्गातील औषधं प्रिस्क्रिप्शनशिवाय देऊ नये'
औषधी विभागाची सर्व किरकोळ औषधी विक्रेत्यांस सूचना
'प्रिस्क्रिप्शन-चिठ्ठीशिवाय सिरपची विक्री नको'
(Cough Syrup) मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बालकांचा मृत्यू तमिळनाडूत उत्पादन होणाऱ्या एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. तामिळनाडूतील एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधाच्या नमुन्यांत भेसळ आढळून आली असून या औषधावर बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमध्ये भेसळीमुळे झालेल्या बालमृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने आता महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. बाल रुग्णांसाठी 'सिरप' प्रवर्गातील औषधे डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय विक्री केल्यास कठोर कारवाईचा इशारा अन्न व औषध विभागाकडून देण्यात आला आहे.
औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम 1945 अंतर्गत अनुसूची एच,अनुसूची एच-1 आणि अनुसूची एक्स या औषधांची विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तरी सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री कोणी करत असेल, तर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.