ताज्या बातम्या
Amaravati : अमरावतीत संत गाडगेबाबा विद्यापीठात विनयभंग, विभाग प्रमुखांकडून लाजीरवाणं कृत्य
संत गाडगेबाबा विद्यापीठात विनयभंगाची घटना, विभाग प्रमुखाने सहकारी प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याचा आरोप. आरोपी विरोधात गुन्हा दाखल, पोलिस तपासात व्यस्त.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून धक्कादायक घटना समोर आली. रसायनशास्त्र विभागातील विभाग प्रमुखांकडून सहकारी प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. विद्यापीठातील महिला-मुली असुरक्षित असल्याचा आरोप केला आहे. सदर गुन्हातील आरोपी डॉक्टर राजेंद्र प्रसाद याच्या विरोधी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.