पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण आग, आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण आग, आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू

आत्तापर्यंत 7 मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरुये.
Published by :
shweta walge

पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागली आहे. या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर आणखी काही कामगार त्यात फसल्याच बोललं जातंय. तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली असून ती विनापरवाना सुरू होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळतीये. काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत आहेत. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आत्तापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरुये.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com