Lokshahi News Channel 5th Anniversary: लोकशाही मराठीचा पाचवा वर्धापनदिन
२६ जानेवारी… भारतीय प्रजासत्ताक दिवस! हाच शभु मुहूर्त साधून २६ जानेवारी २०२० रोजी महाराष्ट्रात 'लोकशाही मराठी' या न्यजू चॅनलची सरुवात झाली. न्यजू इंड्रस्ट्रीत असलेली मरगळ, पक्षपातीपणा आणि कोणा बद्दलही सॉफ्ट कॉर्नर न ठेवता, बातमी आणि घडणारी प्रत्येक घटना जशीच्या तशी दाखवत पदार्पणातच 'लोकशाही'ने इतरांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. या सोबतच रोज उभ्या राहणाऱ्या नव्या आव्हानांना तोंड देत लोकशाहीने या स्पर्धात्मक युगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आपल्या प्रगतीचा आलेख कायम चढता राखला.
लोकशाहीने जपली सामजिक बांधिलकी
लोकशाहीने इतर न्यूज चेनच्या तुलनेत कायमच आपला मार्ग वेगळा राखला आणि शेवटपर्यंत आपली भूमिका चोखपणे बजावली. कारण लोकशाही नुसतं एक न्यूज चॅनल नसून सामान्य माणसाचा समाजाशी, सभोवतालच्या परिस्थितीशी सुरु असलेला एक संघर्ष देखील आहे. म्हणूनच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपलं कर्तव्य बजावत असताना देखील लोकशाहीने आपली सामजिक बांधिलकी सोडली नाही. कोरोना काळात गरजवंताना कायमच अन्न धान्यचं वाटप लोकशाहीच्या माध्यमातून करण्यात येत होत. या शिवाय मास्क, सॅनिटायझर तसेच इतर काही जीवनावश्यक वस्तूंचं वाटप असो किंवा गरीब लहान मुलांच्या तोंडावरच निरागस हसू लोकशाहीला कायमच अत्यंत महत्त्वाचं वाटत आलं आहे.
लोकशाही मराठी सर्वसामान्यांचा बुलंद आवाज
तरुण मुलं आणि काही मोजक्या अनुभवी शिलेदारांच्या मेहनतीने २०२० साली सुरु झालेला लोकशाहीचा हा प्रवास अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात पसरला. कारण लोकशाहीने या प्रवासादरम्यान कायमचं बॅकफुटला न राहता फ्रंटफुटला राहून लोकांना मदत करायला प्रथम प्राधान्य दिलं. जनसामन्यांच्या आवाज त्यांच्या वेदना लोकशाहीने निर्भीडरित्या सरकार समोर मांडल्या आणि शिक्षकांच आंदोलन, आशा वर्कसच्या वेदना, शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांच्या समस्या लोकशाहीने इतर सर्व न्यूज चॅनलच्या तुलनेत सर्वात जास्त तडफदारपणे मांडत मुख्यमंत्र्याना ही या आंदोलनाची दखल घ्यायला भाग पाडलं.
लोकशाही मराठीचा सन्मान
लोकशाही मराठीने मराठवाडा रत्नसन्मान, पुणे रत्नसन्मान, लोकशाही संवाद, सहकार उद्योग संवाद आणि लोकशाही सन्मानच्या अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून येत्या काळातील महाराष्ट्रचं व्हिजन दिगज्जांकडून जाणून घेतलं आणि यासोबत महारष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान देखील केला.
संकटासमोर गुडघे टेकणार नाही
आपली सामजिक बांधिलकी जपत आज इथपर्यंत येऊन पोहोचलेला लोकशाहीचा प्रवास खरच अनेक संकटांनी भरलेला होता. जनसामन्यांच्या आवाज त्यांच्या वेदना लोकशाही मराठीने सरकार समोर मांडल्या आणि सरकारी कामकाजात असलेल्या त्रुटी असो इतर कोणताही गैर कारभार लोकशाही मराठीने तो कायमच निर्भीडरित्या लोकांसमोर आणला आणि निपक्ष पत्रकारितेचं आपलं कर्तव्य चोख बजावलं. या दरम्यान लोकशाही मराठीवर दोनदा बंदी घालण्यात आली. दोन वेळा चॅनेलच प्रसारण थांबवण्यात आलं. तरी प्रचंड इच्छाशक्ती आणि अनेक संकटांचा सामना करून तावून सुलाखून निघालेल्या लोकशाहीच्या टीमने समोर उभ्या असलेल्या एका ही संकटासमोर आपले गुडघे टेकले नाहीत. आणि या पुढे ही टेकणार नाही. स्वाभिमानाने लढा देऊन ही लढाई सुद्धा जिंकली.
लोकशाहीचं स्वप्न कायम जिवंत ठेवण्यासाठी लोकशाही न्यूजची संपूर्ण टीम कायमच प्रयत्नशील
आज लोकशाही मराठीच्या खडतर प्रवासाला पाच वर्ष पूर्ण होऊन खऱ्या अर्थाने लोकशाहीचे सहावे पर्व सुरू होत आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्व थोर महापुरूषांनी पाहिलेलं लोकशाहीचं स्वप्न कायम जिवंत ठेवण्यासाठी लोकशाही न्यूजची संपूर्ण टीम कायमच प्रयत्नशील राहील. आणि त्याकरिता अन्यायाविरुध्द एकजुटीने आवाज बुलंद करून निपक्षपाती ही लोकशाहीची प्रतिमा आम्ही या पुढे ही अशीच कायम राखू यात अजिबात शंका नाही.