Shiv Sena Symbol Case : शिवसेना चिन्ह धनुष्यबाणाबाबत उद्या अंतिम सुनावणी

Shiv Sena Symbol Case : शिवसेना चिन्ह धनुष्यबाणाबाबत उद्या अंतिम सुनावणी

शिवसेना पक्ष आणि चिन्ह या वादाच्या प्रकरणावर 20 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. (Shiv Sena Symbol Case) परंतु, 1 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर टाकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का दिला.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • शिवसेना चिन्ह धनुष्यबाणाबाबत उद्या अंतिम सुनावणी

  • जस्टीस सूर्यकांत दिनांक 8 ऑक्टोबरला नक्की सुनावणी घेतील

  • या वादाच्या प्रकरणावर 20 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार

शिवसेना पक्ष आणि चिन्ह या वादाच्या प्रकरणावर 20 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. (Shinde) परंतु, 1 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर टाकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का दिला. खरं तर, ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयासमोर या प्रकरणाचा उल्लेख करत तातडीच्या सुनावणीची विनंती केली होती. पण त्यांची ही विनंती न्यायालयाने मान्य केली नव्हती. आता उद्या 8 ऑक्टोबरला यावर सुनावणी होणार आहे.

असमी सरोदे यांनी ट्वीट करताना म्हटलं की, शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी घेणार असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं आहे. त्यामुळे जस्टीस सूर्यकांत दिनांक 8 ऑक्टोबरला नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा आहे. इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बांधून तयार नसलेल्या विमानतळाचे नवी मुंबईत दिखाऊ उद्घाटन करणार आणि त्याचवेळी संविधानासोबत अनैतिकता करून सत्तेच्या हवेत असलेल्या एकनाथ शिंदे यांचे विमान सर्वोच्च न्यायालय जमिनीवर पाडणार का? हे लवकरच कळेल, असा टोला असीम सरोदे यांनी लगावला आहे.

दरम्यान, मागील सुनावणीवेळी न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले होते की, या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत, त्यामुळे आम्ही एकदाच काय ते या प्रकरणावर निकाल देऊ. तसंच हे प्रकरण लवकरात लवकर संपवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. 20 ऑगस्ट तारीख सुद्धा त्यानंतर निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी 19 ऑगस्टपासून ते 10 सप्टेंबरपर्यंत पार पडली. त्यानंतर याचा अंतिम निकाल 8 ऑक्टोबरला येण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com