अखेर रोहित पाटील यांचे उपोषण मागे

अखेर रोहित पाटील यांचे उपोषण मागे

सांगलीत पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आलं आहे.
Published by :
shweta walge

सांगलीत पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुमनताई पाटील आणि युवा नेते रोहित पाटील याचे दोन दिवस सुरू असलेले आमरण उपोषण जलसंपदा विभागचे सचिव याचे पत्र वाचून दाखवत सर्व शेतकरी बांधव यांच्या विनंतीने संमतीने हे अदोलन मागे घेण्यात आलं आहे.

रोहित पाटील म्हणाले की, सर्वजण उपोषणाला आले त्या सर्व शेतकरी बांधवांचं आभार मानतो. स्वर्गीय आर आर आबा यांचे स्वप्न होते या गावांना पाणी मिळाले पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही पाठ पुरावा करत गेलो. पण अनेकजण माझे वय लहान आहे म्हणून गोड बोलून पाठवायचे. महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी जयंत पाटील यांच्याकडे आम्ही गेलो होतो, त्यावेळी तत्त्वता मान्यता मिळाली होती, पण लवादाचे नियम होते. त्यामुळे हा निर्णय होऊ शकला नव्हता. हा भाग लवादामुळे पाण्यापासून वंचित राहिला आहे.

पुढे ते म्हणाले, या ठिकाणी राजकीय पक्षाचे अनेक लोक आले आणि सर्वांनी पाठिंबाही दिलाआणि हे उपोषण माघे घ्यावा अशी विनंती ही केली. देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर बोलल्यानंतर जिल्हाधिकारी आले. पण जल संपदा मंत्र्यांचे पत्र मिळाले अशी भूमिका होती. जल संपदा सचिव यांचे पत्र आले आहे. आपल्या मतदार संघातील 23 गावाचा समावेश केला आहे. या प्रक्रियेला 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे. उपोषण माघे घ्यावे ही विनंती या पत्राद्वारे केली आहे. आम्ही 1 महिन्याचा कालावधी थांबू पण याच्या पेक्षा जास्त वेळ लागेल तर मंत्रालय समोर आमरण उपोषण करणारअसा इशारा रोहित पाटील यांनी दिला आहे.

तासगावच्या आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील १९ गावांसाठी टेंभू योजनेतून पाणी द्यावे. सुधारित तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता ही कॅबिनेट बैठकीत देण्यात यावी, या मागणीसाठी आमदार सुमनताई पाटील, पुत्र रोहित पाटील, मुलगी स्मिता पाटील यांच्यासह आर.आर. पाटील कुटुंबीय आणि शेतकऱ्यांनी आज सकाळपासून आमरण उपोषण सुरू केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com