Virar Fire News : धक्कादायक! शिक्षिकेच्या घराला आग, 12 वीच्या उत्तरपत्रिका जळून खाक
विरारमध्ये 12 वी कॉमर्सच्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरारच्या नानाभात या परिसरात राहणाऱ्या प्रिया रोड्रिंक्स या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली आहे. उत्तर पत्रिका जळाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर ही घटना उघड झाली. तसेच याबाबत बोलींज पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून, जळालेल्या उत्तरपत्रिका आपल्या ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहेत. दरम्यान बारावी कॉमर्सच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स या विषयाच्या 175 उत्तर पत्रिका होत्या
याचपार्श्वभूमिवर आता विरार मधील बारावी परीक्षेचे पेपर जळीत प्रकरणात HSC बोर्डाच्या विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे विरारच्या बोलिंज पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. शासनाचा प्रतिनिधी म्हणून जोत्स्ना शिंदे ह्या पेपर जळीत प्रकरणात बोलिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून, गुन्हा दाखल करीत आहेत. ज्योत्स्ना शिंदे यांच्या सोबत पालघरच्या माध्यमिक विभागाच्या जिल्हा शिक्षण अधिकारी संगीता भागवत याही सोबत आहेत. ज्या शिक्षकाच्या घरी बारावीच्या उत्तर पत्रिका जळाल्या त्या शिक्षिकेला ही पोलीस ठाण्यात बोलाविले आहे.