उत्तर प्रदेशमध्ये लग्नाची तयारी सुरू असताना भीषण आग, पाचजणांचा मृत्यू
Admin

उत्तर प्रदेशमध्ये लग्नाची तयारी सुरू असताना भीषण आग, पाचजणांचा मृत्यू

उत्तरप्रदेशमध्ये लग्नाची तयारी सुरू असताना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला असून सातजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत ही आग लागली.
Published by :
Siddhi Naringrekar

उत्तरप्रदेशमध्ये लग्नाची तयारी सुरू असताना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला असून सातजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत ही आग लागली.

या पार्श्वभूमीवर मोरादाबादचे न्यायदंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह म्हणाले की, “मोरादाबादमधील तीन मजली इमारतीत आग लागल्याने पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर सात लोक जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य या इमारतीत राहत होते. अग्निशमन दल आगीच्या कारणाचा तपास करत आहे.”

ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. स्थानिकांनीही मदत कार्याला हातभार लावत सात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com