दुर्गा मंडपात आरती सुरु असतानाच भीषण आग; 3 भाविकांचा मृत्यू तर 64 जण गंभीर जखमी

दुर्गा मंडपात आरती सुरु असतानाच भीषण आग; 3 भाविकांचा मृत्यू तर 64 जण गंभीर जखमी

अपघाताचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल

लखनऊ : उत्तर प्रदेशात नवरात्रोत्सवादरम्यान दुर्गा मंडपाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 64 जण गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरु आहे. या मंडपात 300 भाविक उपस्थित होते. या अपघाताचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशातील भदोही येथील दुर्गा मंडपात माँ दुर्गेची आरती सुरू होती आणि मंडपात उपस्थित लोक आरतीमध्ये तल्लीन झाले होते. याचदरम्यान अचानक उजव्या बाजूला आग लागल्याचे दिसले व लोकांची पळापळ सुरु झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर, 64 जण गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत लोकांना सुखरुप बाहेर काढले.

दरम्यान, आगीचे कारण सध्या स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com