ताज्या बातम्या
मुंबईकरांची चिंता वाढली; GBS मुळे एकाचा मृत्यू
राज्यात 'गुलेन बॅरी सिंड्रोम'च्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहेत.
राज्यात 'गुलेन बॅरी सिंड्रोम'च्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहेत. राज्यात 'गुलेन बॅरी सिंड्रोम'मुळे चिंता वाढली आहे. यातच मुंबईतही GBS आजाराने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
सोमवारी रात्री एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या रुग्णावर मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती ठीक नसल्या कारणाने 23 जानेवारी रोजी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
पुण्यानंतर आता मुंबईतही 'गुलेन बॅरी सिंड्रोम'चे रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 'गुलेन बॅरी सिंड्रोम'चे 197 संशयित रुग्ण आढळले आहेत.