H3N2 Virus : महाराष्ट्रात H3N2 चा पहिला रुग्ण दगावला
Admin

H3N2 Virus : महाराष्ट्रात H3N2 चा पहिला रुग्ण दगावला

कोरोनाने कुठे विश्रांती घेतलेली असताना सर्व नीट सुरू झालेले असताना आता नवीन व्हायरसने एन्ट्री घेतली आहे.

कोरोनाने कुठे विश्रांती घेतलेली असताना सर्व नीट सुरू झालेले असताना आता नवीन व्हायरसने एन्ट्री घेतली आहे. H3N2 हा व्हायरने आता पुण्यात धडक दिली आहे.

पुण्यात H3N2 चे 22 रुग्ण आढळले आहेत. तपासणीसाठी आलेल्या 109 संशयित रूग्णांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. H3N2 इन्फ्लूएंझा हा नवा विषाणू देशात वेगाने पसरतोय. तेव्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा तसंच काळजी घ्या असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिल्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा बळी घेतला आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा मृत्यू झाल्याने आता आरोग्य विभाग अलर्ट होत असतांना नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. सर्दी ताप आणि खोकला अशी काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com