Srinagar
Srinagar

Srinagar : श्रीनगर विमानतळाच्या रनवेवरून बर्फ हटवून विमानसेवा पूर्ववत

श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असून विमानसेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Srinagar) श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असून विमानसेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. सर्व विमानसेवा ठप्प झाली होती. संपूर्ण श्रीनगर शहर बर्फाच्या पांढऱ्या चादरीखाली झाकून गेल्याचे पाहायला मिळत आहे.

या बर्फवृष्टीमुळे धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून पर्यटकांची गैरसोय झाली आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आणि हवाई सेवा विस्कळीत झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता श्रीनगर विमानतळाच्या रनवेवरून बर्फ हटवून विमानसेवा पूर्ववत करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. बर्फवृष्टीमुळे खंडीत झालेली विमानसेवा दोन दिवसानंतर पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असून विमानसेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती

  • श्रीनगर विमानतळाच्या रनवेवरून बर्फ हटवून विमानसेवा पूर्ववत

  • बर्फवृष्टीमुळे खंडीत झालेली विमानसेवा दोन दिवसानंतर पुन्हा सुरू

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com