Solapur Rain : सोलापुरातील अनेक गावात पूर परिस्थिती; प्रणिती शिंदेंच्याकडून पूरग्रस्त गावात पाहणी, म्हणाल्या की...

सोलापूर पूरस्थिती: प्रणिती शिंदेंची पाहणी, मदतीसाठी सरकारकडे मागणी.

थोडक्यात

  • राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे.

  • ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याचा प्रकार झाला आहे.

  • सोलापूर जिल्ह्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचे पाणी गावागावांत केल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे.

  • माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदेंनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत, कोणत्या आहेत खाली लेखांत वाचकांना समजेल.

Praniti Shinde : राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जास्तकरुन ग्रामीण भागात पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास हिरावून घेतल्याचा प्रकार घडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, ग्नामीण माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद शाळांना देण्यात आली सुट्टी आहे. असाच पाऊ, पडला तर, अतिवृष्टीमुळे येण्याची शक्यता आहे.

सोलापूरातील मोहळ तालुक्यातील शिंगोली तरडगाव येथे खासदार प्रणिती शिंदेंनी पाहणी केली आहे. सोलापूरसह राज्यभरात पूरग्रस्त भागातील ओला दुष्काळ जाहीर करुन मदत करा. केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी या पूर परिस्थितीला विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे वाचूयात...

सोलापूर जिल्ह्याची पाहणी करताना त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, "मुख्यमंत्र्यांना भेटली त्यावेळेस त्यांना म्हणाली की, एनडीआरफची एकच बोट याठिकाणी आली आहे. कारण दोन दिवसांत आणखीन पाणी येण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या स्थलांतरावर आता भर देण्याची गरज असल्याचे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच पाणी ओसल्यानंतरच सरसकट सर्वांचे पंचनामे झाले पाहिजेत. शेतकऱ्यांवर कोणतीही अट न टाकता सगळ्यांना मदत तेली पाहिजे. केद्रांला आम्ही सांगणार आहोत की, महाराष्ट्रासाठी वेगळे पॅकेज देण्याची गरज आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com