Nanded Flood : नांदेड जिल्हा पूर परिस्थतीच्या उंबरठ्यावर! विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले
नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे नांदेडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान गोदावरी, आसना नदी अनेक उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्यामनुळे मोठा पूराचा धोका वर्तावला जात आहे.
याच पार्श्वभूमिवर आता नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडल्याने नांदेड जिल्हा पूर परिस्थितीच्या उंबरठ्यावर आहे. मुसळधार पावसामुळे आसना नदीच्या पुराचं पाणी शेतीमध्ये सिरले आहे, ज्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याच पार्श्वभूमिवर गोदावरी नदीपात्रात 2 लाख 48 हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. त्याचसोबत गोदावरी नदीकाठी हजारो हेक्टरवरील शेती पिकांना फटका बसला आहे. गोदावरी नदीचे पाणी नांदेड शहरातील अनेक भागात शिरण्यास सुरुवात झाली असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे.