Rainy Season Foot Care : पावसाळ्यात अशी घ्या पायाची योग्य काळजी
पावसाळा आला की त्वचेचे आजारही उद्भवतात. त्यातच सतत पावसाच्या पाण्याचा पायांशी संपर्क आल्यास पायाच्या बोटांमध्ये चिखल्या (जखम) होऊ त्रास सुरू होतो. यासाठी योग्य उपाय योजना केल्यास हा त्रास दूर होण्यास मदत होते. पावसाळ्यात पायांना चिखल्या होऊ नयेत म्हणून पाय स्वच्छ ठेवा, पावसाळ्यात पायाला चिखल्या होण्याचा धोका जास्त असतो. कारण चिखलातील जीवाणू त्वचेला चिकटून राहतात. पावसाच्या पाण्याचा संपर्क आल्यानंतर म्हणून नियमितपणे पाय स्वच्छ धुवा. तसेच पाय नेहमी कोरडे ठेवा. चिखलामुळे किंवा पाण्याचा जास्त संपर्क आल्याने पायांची त्वचा ओली राहू नये. ओल्या पायांवर चिखल्या होण्याचा धोका जास्त असतो.
चिखल्यांवर करा हे उपाय
कडुलिंबाची पाने : कडुलिंबाची पाने वाटून पेस्ट तयार करा आणि खाज येत असेल अशा ठिकाणी लावा.
नारळाचे तेल : नारळाचे तेल, लेमन ग्रास किंवा तिळाच्या तेलासह मिसळून खाज येत असलेल्या ठिकाणी लावा, असे केल्यास त्वचेचे इन्फेक्शन कमी होते.
स्क्रबिंग : खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडी साखर मिसळून पायाचा वरचा भाग आणि तळवे स्क्रब करा.
अँटीफंगल क्रीम : जर चिखल्या झाल्या असतील तर डॉक्टरांनी सांगितलेल्या अँटीफंगल क्रीम वापरा.
योग्य चप्पल : पावसाळ्यात योग्य चप्पल वापरा जेणेकरून तुमचे पाय कोरडे राहतील.
नियमित तपासणी : जर तुम्हाला चिखल्या झाल्याचे वाटत असेल तर डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्या.