ताज्या बातम्या
BJP offers Vishal Patil : प्रवेशाबाबत भाजपाचे नेते चंद्रकात पाटील म्हणाले, राजकारणामध्ये नेहमी...
विशाल पाटलांना भाजपमध्ये सामील होण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आवाहन, सांगलीच्या विकासावर भर
सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांना भाजप मंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी विचार करावा, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी थेट ऑफर दिली आहे. राजकारणामध्ये नेहमी वर्तमानावर चालावं लागतं आणि वर्तमानात विशाल पाटलांकडे 4 वर्षे 4 महिने आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मात्र विशाल पाटलांनी यावर भाष्य करणं टाळले असून, यावर पत्रकार परिषद घेऊन बोलणार असल्याचं विशाल पाटलांनी स्पष्ट केलं आहे.