Satish Bhosale from Beed : सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागाची मोठी कारवाई, घरावर फिरवला बुलडोझर

Satish Bhosale from Beed : सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागाची मोठी कारवाई, घरावर फिरवला बुलडोझर

बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागाची मोठी कारवाई; अतिक्रमण हटवण्यासाठी बुलडोझरचा वापर, गांजा आणि प्राण्यांचं वाळलेलं मांस जप्त.
Published on

बीडमध्ये सतीश भोसले याने एका व्यक्तीला बॅटच्या सहाय्याने अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर बीडमधील सतीश भोसलेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अस असताना आता सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अटकपूर्व जामीनात नवा अडथळा निर्माण झाला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्याच्या राहत्या घरातून वनविभागानं प्राण्यांचं वाळलेलं मांस जप्त केलं.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधात NDPS कायद्या अंतर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल केला आहे. खोक्याला वनविभागानं सात दिवसांची मुदत दिली असून, सात दिवसांनंतर वनविभाग त्याच्या घराचा ताबा घेऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे. 8 मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभाग आणि पोलिसांनी छापा टाकला होता, यादरम्यान त्याच्या घरात काळ्या बाजारात 7 हजार 200 रुपये किंमत असलेला 600 ग्रॅम सुका गांजा आणि प्राण्यांचं वाळलेलं मांसही या कारवाईत जप्त करण्यात आलं आहे.

त्याच्याविरोधात शिरूर, पाटोदा, अंभोरा पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरावर कार्यवाही करणार अशी नोटीस वन विभागाने दिली होती सात दिवसाचा कालावधी असताना आजच ही कार्यवाही वन विभागाने हाती घेतली आहे. वनविभागाच्या जागेतील असलेले अतिक्रमण हटवण्याची ही कार्यवाही चालू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com