शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात गोळीबार, दोन जणांचा जागीच मृत्यू
Admin

शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात गोळीबार, दोन जणांचा जागीच मृत्यू

साताऱ्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने गोळीबार केला.
Published by :
Siddhi Naringrekar

साताऱ्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने गोळीबार केला. शिवसेनेचे ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम असे त्यांचे नाव आहे. आरोपी मदन कदम हा ठाण्यातील माजी नगरसेवक आहे.

या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्या निकटवर्तीय म्हणून मदन कदम यांची ओळख आहे.

मदन कदम आणि कोरडेवाडी गावातील लोकांसोबत वाद झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मदन कदम यांना ताब्यात घेतलं असून या प्रकणाचा तपास सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com