नाशकात शिंदे गट व ठाकरे गटात राडा हवेत गोळीबार; नेमका गोळीबार कुणी केला?
महेश महाले, नाशिक
नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने येऊन शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवळाली गाव परिसरात काल सायंकाळी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये राडा होऊन शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटेंचा मुलगा स्वप्नील याने बंदूक काढत हवेत गोळीबार केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
अध्यक्ष पदाच्या निवडीवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये सुरुवातील राडा झाला होता, याच दरम्यान शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा मुलगा असलेल्या स्वप्नील लवटे याने राग आल्याने कमरेला लावलेली बंदूक काढून हवेत गोळीबार केला आहे.19 फेब्रुवारीला शासकीय शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी अध्यक्ष निवड केली जाणार होती. याच दरम्यान हा गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी स्वप्नीलला ताब्यात घेतले असून उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे