सुप्रिया सुळेंना धक्का; राष्ट्रवादीच्या 'या' माजी आमदाराचा उद्या भाजपामध्ये प्रवेश

सुप्रिया सुळेंना धक्का; राष्ट्रवादीच्या 'या' माजी आमदाराचा उद्या भाजपामध्ये प्रवेश

राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटचे सहकारी आहेत.

पुरंदरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचा हा प्रवेश सुप्रिया सुळेंना धक्का बसल्याचे समजते. राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटचे सहकारी आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अशोक टेकवडे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

तालुकाध्यक्षांवर टेकवडे यांनी या पत्रातून गंभीर आरोप केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला नाही. तो पदाधिकाऱ्यांचा पक्ष झाला आहे. अशी टीका त्यांनी केली होती. टेकवडे यांनी जिल्हाध्यक्षांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रावर कारवाई न झाल्याने त्या नाराजीतून त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळते आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com