ताज्या बातम्या
Shiv Sena Uddhav Thackeray Faction : ठाकरे गटाच्या माजी आमदाराचा ठाकरे शिंदे युतीवर पूर्णविराम!
ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी पडदा टाकला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सत्ताधारी पक्षाशी कोणतीही युती करणार नाही.
शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Eknath Shinde Faction) आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट (Shiv Sena Uddhav Thackeray Faction) सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी पडदा टाकला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सत्ताधारी पक्षाशी कोणतीही युती करणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन त्या वरिष्ठांच्या कानावर घालून शहर विकास आघाडीमध्ये जावं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी याचा वरिष्ठ विचार करतील. अशी माहिती ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
