R.T. Deshmukh Passed Away : आर.टी. देशमुख यांचे अपघाती निधन
परळी तालुक्याचे भूमिपुत्र व माजलगाव भाजप विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आर.टी. जिजा देशमुख यांच्या गाडीचा प्रवासादरम्यान लातूर-तुळजापूर -सोलापूर रस्त्यावरील बेलकुंड जि.धाराशिव गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आज त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला राज्यातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेश विटेकर यांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी सर्वांनी देशमुख यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. आर. टी. जिजा देशमुखांच्या अचानक जाण्याने राजकीय, सामाजिक आणि जनतेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आर. टी. देशमुख हे दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत निकटचे विश्वासू सहकारी होते. वैद्यनाथ कारखान्यात सुरुवातीपासूनच ते संचालक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची उल्लेखनीय कारकीर्द ठरलेली आहे.