Accident
ताज्या बातम्या
Accident : अमरावतीत एसटी आणि रिक्षाचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू
अमरावतीत एसटी आणि रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Accident) अमरावतीत एसटी आणि रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून अमरावती जिल्ह्यातील वरुड-राजुरा बाजार रोडवर हा अपघात झाला.
शाळेतील मुलं हे वरुडला जात असताना एसटी महामंडळाच्या बसने ॲटोला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. काही जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पुढील तपास वरुड पोलीस करत आहे. या घटनेनंतर वरूड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
Summary
अमरावतीत एसटी आणि रिक्षाचा भीषण अपघात
अपघातात शाळकरी मुलांसह अन्य तिघांचा जागीच मृत्यू
अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
